28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....
HomeEntertainmentना सूत्रसंचालन, ना प्रेक्षक, तरीही & the OSCAR goes to..

ना सूत्रसंचालन, ना प्रेक्षक, तरीही & the OSCAR goes to..

प्रत्येक वर्षी साजर्या होणाऱ्या ऑस्कर सोहळा पुरस्काराची शान काही औरच असते. यात अनेक हॉलिवूड आणि बॉलीवूडचे गायक गायन सादर करतात. तर काही सेलिब्रिटी परफॉर्मन्स करतात. यंदा मात्र हा सोहळा दोन ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. लॉस एंजलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये ऑस्कर पुरस्कार बक्षिस सोहळा वितरीत होईल, तर लॉस एंजलिस युनियन स्टेशनमध्ये ऑस्करमध्ये होणाऱ्या सदर करण्यात येणाऱ्या कलांचं सादरीकरण होणार आहे. खरंतर ऑस्कर सोहळयाचे आयोजन फेब्रुवारी महिन्यात केले जाते. पण सध्या सुरु असलेल्या कोव्हिडच्या लाटेमुळे या सोहळ्याला यंदा दोन महिने उशीर झाला आहे. दरवेळी या कार्यक्रमाला ज्युरी मेंबर्स असतात. कलाकार असतात. तीन मजल्यांवर हे पाहुणे असतात. यंदा मात्र या सोहळ्याला कुणालाही निमंत्रण पाठविण्यात आलेले नाही.

अमेरिकेतच्या प्रमाण वेळेनुसार हा सोहळा तिकडे रविवारी सायंकाळी सुरू होणार असून भारतात तो सोमवारी पहाटे साडेपाच वाजल्यापासून दिसेल. डिस्ने-हॉटस्टार या ओटीटीवर आपल्याला तो पाहता येणार आहे. यंदा मॅंक या चित्रपटाला ऑस्करमध्ये १० नामांकनं मिळालेली आहेत. याशिवाय प्रॉमिसिंग यंग वूमन, ब्लॅक बॉटम, ज्युडस एंड द ब्लॅक मसाया, साऊंड ऑफ मेटल द फादर, मिनारी, द ट्रायल ऑफ द शिकागो ७, नोमॅडलॅंड या चित्रपटांचाही यात समावेश होता.

Oscar Best Director Academy Award.

लॉस एंजलिसमध्ये घुमणारे एंड ऑस्कर गोज टू.. हे शब्द कानात साठवण्यासाठी अख्खा हॉलिवूड आणि बॉलीवूड चाहते आसूसलेले असतात. तो दिमाखदार सोहळा देखणा असतोच. पण त्याआधी असणारं रेड कारपेटही पाहण्यासारखं असत. जगाच्या काना कोपऱ्यातून सिने रसिकांना वेड लावणारे अनेक कलाकार वेगवेगळ्या हटके लुक मध्ये रेड कारपेटवर अवतरतात. त्यांची फॅशन आणि त्यांची एक छबी टिपण्यासाठी कॅमेरे सरसावतात आणि त्यानंतर ऑस्कर्सचा सोहळा दिमाखात सुरु होतो. हे चित्र दरवर्षीचं असत. पण यंदाच्या वर्षी मात्र या सोहळ्यामध्ये खूप बदल करण्यात आले आहेत. कोरोनाने जगभर हाहाकार माजवला आहे. भारतीयांना  26 एप्रिलला पहाटे साडेपाच ते साडेआठ या वेळेत हा सोहळ्याचा आनंद घेता येणार आहे.

कलाविश्वात प्रत्येक कलाकारासाठी महत्वाचा आणि अतिशय मानाच्या समजल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली असून, एकामागून होणारा कलाकारांचा गौरव या सोहळ्यात झाल्याचं आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळालं. अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे पार पडलेल्या या 93 व्या ऑस्कर सोहळ्यात विविध विभागातील पुरस्कार प्रदान करण्यात आले. परंतु, यंदाच्या पुरस्काराची खासियत अशी आहे कि, जशी आयपीएल प्रेक्षकांविना खेळवली जाते आहे, तसेच या वेळेला ऑस्करच्या रचनेमध्येही बदल करण्यात आला आहे, यंदाच्या कार्यक्रमाचे ना सूत्रसंचालन कोणाच्या हाती होते,  ना कोणत्याही  प्रेक्षकाची या सोहळ्यासाठी उपस्थिती होती. ऑस्कर सोहळ्यामध्ये दरवर्षी ज्या कलाकारांनी या जगाचा निरोप घेतला, त्यांना आदरांजली वाहण्यात येते. हे वर्षंही त्याला अपवाद नव्हतं. यावेळी गतवर्षी निधन झालेल्या इरफान खान आणि जगविख्यात वेषभूषाकार भानू अथय्या यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

- Advertisment -

Most Popular