Sunday, March 7, 2021
Home India News पेट्रोल-डिझेलच्या वाढल्या किंमती

पेट्रोल-डिझेलच्या वाढल्या किंमती

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारी रोजी २०२१-२२ चे सर्वसाधारण बजेट सादर केले. त्यांनी पेट्रोलवर प्रति लीटर २.५ रुपये आणि डिझेलवर ४ रुपये प्रति लीटर सेस वाढवण्याची घोषणा केली होती. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी ६ वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी चलनांच्या आधारावर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत, या आधारावर रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होत असतात.

Rising petrol diesel prices again in india

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्य जनता हवालदिल झाली आहे. एका आठवड्यानंतर सरकारी कंपन्यांनी पुन्हा एकदा इंधनाचे दर बुधवारी वाढवले आहेत. जर गेल्या एका वर्षाचा आढावा घेतला तर पेट्रोलचे दर १३.५५ रुपयांनी वाढले आहेत. २ फेब्रुवारी २०२० रोजी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर ७३.१० रुपये प्रति लीटर होते, तर डिझेलचे दर ६६.१४ रुपये प्रति लीटर होते. मुंबईमध्ये पेट्रोलचे दर ९३.२० रुपये प्रति लीटर आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलचे दर गेले अनेक दिवस शतक पूर्तीच्या जवळपास आहेत. त्यामुळे सामान्य जनतेसमोर मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. 

लक्ष टाकूया महानगरांमधील पेट्रोलचे दरांवर –

दिल्ली: पेट्रोल ८६.५५ रुपये आणि डिझेल ७६.८३ रुपये प्रति लीटर

मुंबई: पेट्रोल ९३.२० रुपये आणि डिझेल ८३.७३ रुपये प्रति लीटर

कोलकाता: पेट्रोल ८८.०१ रुपये आणि डिझेल ८०.४१ रुपये प्रति लीटर

चेन्नई: पेट्रोल ८९.१३  रुपये आणि डिझेल ८२.०४  रुपये प्रति लीटर

पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर आत्ता एसएमएसच्या माध्यमातून जाणून घेता येऊ शकतात. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो ९२२४९९२२४९ वर पाठवावा. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी ६ नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर एसएमएसद्वारे दर पाहू शकता. तुम्ही ९२२४९९२२४९ वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल आणखी माहिती जाणून घेऊ शकता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments