Monday, March 1, 2021
Home International News वॉशिंग्टन डीसीमध्ये संचारबंदी

वॉशिंग्टन डीसीमध्ये संचारबंदी

निवडणूक निकालांबाबत अमेरिकेच्या संसदेची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत इलेक्टोरल कॉलेजबाबत चर्चा सुरु होती. बैठकीत जो बायडन यांच्या विजयाची घोषणा केली जाणार होती. परंतु त्याचवेळी ट्रम्प समर्थक कॅपिटल बिल्डिंगमध्ये घुसले, परिणामी संसदेचं कामकाज थांबवावं लागलं. ट्रम्प समर्थकांनी कॅपिटल बिल्डिंगबाहेर गोंधळही घातला. या घटनेवर देशभरात टीका केली जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाला असून जो बायडेन नवे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. परंतु, ट्रम्प आपला पराभव मानण्यास तयार नाहीत. बायडेन यांनी निवडणुकीत घोळ घालून विजय मिळविल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. पराभव मान्य नसल्यामुळेच ट्रम्प यांनी त्यांच्या समर्थकांना वारंवार चिथावले होते.

आज जो बायडेन यांना प्रमाणित करण्याची प्रक्रिया पार पडणार होती. म्हणजे बायडेन यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होणार होते. या प्रक्रियेवर शिक्कामोर्तब होऊ नये म्हणून या सोहळ्यापूर्वीच ट्रम्प समर्थकांनी संसद परिसरात घुसून धुडगूस घातला. काही आंदोलकांनी संसदेच्या उपाध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत जाऊन गोंधळ घातला. त्यामुळे पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यात चौघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी ५७ आंदोलकांना अटक केली असून आंदोलकां कडून बंदुका जप्त केल्या आहेत. कॅपिटल बिल्डिंगवर झालेल्या हल्ल्यामुळे अमेरिकेत संतापाची लाट पसरली आहे. या हल्ल्यामुळे जनतेतून टोकाच्या प्रतिक्रिया उमटत असून त्यामुळे डोनाल्ड समर्थक आणि बायडेन समर्थक असे दोन गट अमेरिकेत निर्माण झाले असून आगामी काळात अमेरिकेत यादवी युद्ध होण्याची शक्यताही वर्तवली जात असल्याचं राजकीय जाणकार सांगत आहेत.

काही दिवसांपूर्वीच वॉशिंग्टन डीसीमध्ये ट्रम्प यांनी त्यांच्या समर्थकांची रॅली आयोजित केली होती. यावेळी त्यांनी दीड तास भाषण केलं होतं. या भाषणातून त्यांनी त्यांच्या समर्थकांना सतत चिथावलं होतं. शिवाय ट्रम्प हे वारंवार ट्विट करून त्यांच्या समर्थकांना चिथावत होते. त्यानंतरच हा हल्ला झाला आहे, हल्ल्याची संस्कृती अमेरिकेत ट्रम्प यांनीच आणली. ट्रम्प हे स्वत:च्या प्रेमात आहेत. इमेज राखण्यासाठी आणि ईगो जपण्यासाठी ते काहीही करतात. असा नेता पूर्वी अमेरिकेत कधीही झाला नाही. ते लोकशाहीतील नेत्यासारखे वागत नाहीत. ते हुकूमशहांसारखेच वागतात. ते मार्केटर आहेत. सेल्स आणि मार्केटिंगचं त्यांच्याकडे स्किल आहे. हे स्किल राजकारणापेक्षा वेगळं आहे. असं मिशिगन येथील डेमोक्रेटिक पक्षाचे भारतीय वंशाचे उमेदवार श्री ठाणेदार यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं. या घटनेवर त्यांनी तीव्र नाराजीही व्यक्त केली.

निवडून आलेले अध्यक्ष जो बायडन म्हणाले की, मी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आवाहन करतो की,  त्यांनी आपली शपथ पूर्ण करुन संविधानाचं संरक्षण करावं आणि हा वेढा संपवण्याची मागणी करावी. कॅपिटल बिल्डिंगवर झालेला गोंधळ हा देशद्रोह असल्याचं जो बायडन म्हणाले. “मी स्पष्ट करतो की, कॅपिटल बिल्डिंगबाहेर जो गोंधळ झाला आम्ही तसे नाहीत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments