26 C
Mumbai
Friday, October 11, 2024

लाडक्या बहि‍णींचे साड्यांसाठी हाल, नेमकं काय घडलं?

लाडक्या बहिणीच्या धर्तीवर सत्ताधारी शिंदे गट आणि...

पेजर आणि रेडिओ स्फोटानंतर, लेबनॉन पुन्हा स्फोटांनी हादरलं

लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांवर इस्रायलचे हल्ले थांबत नाहीत....
HomeSports Newsकोरोनामुळे केकेआर विरुद्ध आरसीबी सामना रद्द

कोरोनामुळे केकेआर विरुद्ध आरसीबी सामना रद्द

आयपीएलमध्ये आज केकेआर आणि आरसीबी यांच्यामध्ये सामना होणार होता. मात्र या सामन्यापूर्वीच दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झाल्यामुळं हा सामना पुढे ढकलण्याचा निर्णय आयपीएल प्रशासनानं घेतला आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट थैमान घालतेय. नुकतेच एका दिवसांत ४ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले. या पार्श्वभूमीवर सर्व काळजी घेऊन आयपीएलचे सामने खेळवले जात आहेत. मात्र आता आयपीएलमध्ये देखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे. खेळाडूंमध्ये देखील आता कोरोना पसरत असल्याने खेळाडू आणि व्यवस्थापनाच्या टीममध्ये घबराट पसरली आहे.

कोलकाता संघातील वरूण आणि संदीप या खेळाडूंची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. त्यामुळे या संघाविरुद्ध मैदानात उतरायला बंगळुरूच्या टीमनं नकार दिलाय. त्यामुळे आजचा सामना पुढे ढकलत असल्याची माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला दिलीय. आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण २९ सामने खेळवले आहेत. आजचा हा सामना विशेष असणार होता. फ्रंट लाईन वर्कर्सच्या समर्थनार्थ बंगळुरूचा संघ निळ्या जर्सीसह मैदानात उतरणार होता. मात्र दोन खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह आल्याने हा सामना पुढे ढकलण्यात आला आहे. गेल्याच आठवड्यात झम्पा, रिचर्डसन आणि अँड्र्यु टाययांनी कोरोनाच्या भीतीमुळे आयपीएल मधून माघार घेत मायदेशी परत गेले. कुटुंबीयांना कोरोनाची लागण झाल्यामुळे आर. अश्विनने स्पर्धेतून माघार घेतलीय. आता आणखी दोन खेळाडूंना कोरोना झाल्यामुळे आयपीएलवर कोरोनाचं गडद सावट निर्माण झालं आहे.

कोलकाता विरुद्ध बंगळुरु यांच्यातील आयपीएलची 30 मॅच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवली जाणार होती. परंतु कोलकात्याच्या संघातील फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर्स यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आल्याने हा सामना तूर्तास पुढे ढकलण्यात आला. वरुण चक्रवर्ती खांद्याच्या स्कॅन तपासणीसाठी बायो बबलच्या बाहेर गेला असल्याने, कदाचित त्याच वेळी त्याला कोरोना लागण झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वरुण चक्रवर्ती आणि वॉरियर सोडून इतर टीम मधील खेळाडूंची टेस्ट केली असता, केकेआरचे बाकीचे खेळाडू ठीक आहेत, त्यांचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत.

संपूर्ण देशात कोरोनाने कहर माजवलेला असताना अशा वातावरणात देखील आयपीएलची स्पर्धा सुरु आहे. संपूर्ण काळजी घेऊन ही स्पर्धी खेळविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर स्पर्धी सुरु झाल्यापासून खेळाडू बायो बबल मध्येच आहेत. दर दोन ते तीन दिवसांनंतर त्यांची कोरोना चाचणी केली जात आहे तसेच त्यांचं हेल्थ चेकअपही केलं जात आहे. आजच्या केल्या गेलेल्या चाचणीमध्ये कोलकात्याचे वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर्स या दोन खेळाडूंचे रिपोर्ट कोरोना पोझिटीव्ह आल्याचे समोर आलं आहे.

केकेआर आणि आरसीबी यांच्यामध्ये होणारा आजचा सामना रद्द झाला आहे. केकेआर संघातील खेळाडूची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे, त्यामुळे आजचा सामना तूर्तास रद्द करून पुढे ढकलण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, कोलकता नाईट रायडर्स संघातील काही खेळाडू आणि कर्मचारी आजारी पडले असून त्यांना विलगीकरणात ठेवेले गेले आहे. अशातच या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. यांच्यातील आजचा आयपीएल सामना रद्द करण्यात आला असून, हा सामना अहमदाबादमध्ये होणार होता. आयपीएलने याबाबत ट्विट करत अधिकृत माहिती दिली आहे.

- Advertisment -

Most Popular