25 C
Mumbai
Tuesday, March 19, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....
HomeIndia Newsहोम आयसोलेशनसाठी नव्या गाईडलाईन्स

होम आयसोलेशनसाठी नव्या गाईडलाईन्स

राज्यातील एकूण भयावह परिस्थिती पाहता, कोरोनाची सर्वसामान्य लक्षणं असणारे रुग्ण होम क़्वारनटाइन हाच पर्याय निवडतात. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जे होम क़्वारनटाइन पर्याय निवडतात त्यांच्यासाठी सुधारित दिशा निर्देशामध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून नवीन सुधारित निर्देशामध्येमध्ये घरी क़्वारनटाइन असणाऱ्या तसेच फक्त सामान्य लक्षणं असणाऱ्या रुग्णांनी वैयक्तिकरित्या घरी रेमडेसिविर इंजेक्शन खरेदी करून स्वत: घेण्याचा प्रयत्न करू नये, असे स्पष्ट आदेश देण्यात आला आहे. रेमडेसिविर इंजेक्शन हे केवळ रुग्णालयातच डॉक्टरांच्या देखरेखीखालीचं दिले जाऊ शकते, असंही आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.

होम आयसोलेशनसाठी नव्या गाईडलाईन्स

सामान्य लक्षणं असणाऱ्या रुग्णांना कोणतेही स्टेरॉईड देण्यात येऊ नये, तसंच सात दिवसानंतरही लक्षणं कमी झाली नाही, जसे कि ताप, सर्दी, जास्त प्रमाणात खोकला इत्यादी वर उपचार म्हणून डॉक्टरांचा सल्ला घेऊन कमी तीव्रतेची ओरल स्टेरॉईड वापरता येऊ शकतील, असंही या गाईडलाईन्समध्ये स्पष्ट म्हटलं गेलं आहे. नव्या गाईडलाईन्सनुसार, ६० वर्षांहून अधिक वयाच्या रुग्णांनी किंवा हायपरटेन्शन, मधुमेह, हृदयरोग, फुफ्फुसाचा आजार असणाऱ्या रुग्णांनी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच होम आयसोलेशनमध्ये राहावं, जर काहीही त्रास जाणवत असेल तर हॉस्पिटल मध्ये दाखल व्हावे.

home isolation new rules

तसेच ऑक्सिजन सॅच्युरेशन लेव्हल कमी झाल्यास किंवा त्यामुळे श्वास घेण्यात काही अडथळे जाणवत असल्यास रुग्णांनी वेळ न घालविता, त्वरित रुग्णालयात दाखल होऊन डॉक्टरांकडून सल्ला घेणे गरजेचे आहे. नवीन सुधारीत गाईडलाईन्स नुसार, रुग्णांना किंवा हलकी लक्षणं जाणवणाऱ्या नागरिकांना किमान दिवसातून २ वेळा गरम पाण्याच्या गुळण्या करण्याचा तसेच दिवसातून दोन-तीन वेळा गरम पाण्याची वाफ घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच ताप नियंत्रणासाठी ६५० एमजीची पॅरासीटेमॉल दिवसातून चार वेळा घेतल्यानंतरही ताप नियंत्रणात आला नाही तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

१ मे पासून सर्वांचेच लसीकरण

डॉक्टरांना उपचाराचा सल्ला देताना, डॉक्टरांकडून दिवसातून दोन वेळा २५० एमजी नॅप्रोक्सेन सारख्या इतर औषधांचा सल्ला दिला जाऊ शकतो. रेमडेसिविरचा इंजक्शनचा वापर किंवा इतर कोणतीही चाचणी ही निव्वळ डॉक्टरांच्या सल्ल्यानं आणि रुग्णालयात जाऊनच करणे गरजेचे आहे. घरी राहून रेमडेसिविर खरेदी करून वापर करण्याचा प्रयत्न करू नये, यावर आरोग्य मंत्रालयाकडून निक्षुन सांगण्यात  आले आहे. कोणत्याही प्रकारची लक्षणं न जाणवणाऱ्या रुग्णांनी प्रयोगशाळेत जाऊन चाचणी करून घेऊन पाहायला हवी. यामध्ये व्यक्तींना कोणत्याही पद्धतीचे लक्षणं जाणवू नयेत तसंच त्यांचं ऑक्सिजन लेवल ९५ टक्क्यांपेक्षा कमी व्हायला नको. साधारण लक्षणं असणाऱ्या रुग्णांना श्वसन सम्बंधित कोणताही अडथळा जाणवू नये तसंच त्यांची ऑक्सिजन पातळी ९४ पेक्षा अधिक असणे गरजेचे आहे. सुधारीत गाईडलाईन्स होम आयसोलेशनसाठी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आल्या आहेत.

- Advertisment -

Most Popular