27 C
Mumbai
Thursday, September 12, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...
HomeSports Newsपरदेशी खेळाडूंपुढे मोठे आवाहन

परदेशी खेळाडूंपुढे मोठे आवाहन

आयपीएलचा 14वा मोसम कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामूळे स्थगित करण्यात आला. कोरोनाने आयपीएल मध्ये देखील शिरकाव केल्याने परिस्थिती एकदम चिंताजनक बनली आहे. 3 फ्रँचायझीमधील गेल्या 2 दिवसांत 4 खेळाडू आणि 1 स्टाफचा रिपोर्टस पॉझिटिव्ह आले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, एकदा शिरकाव झाल्याने , इतर खेळाडूना लागण होऊन आणखी प्रकरणे समोर येऊ शकतात. अशा परिस्थितीत बर्‍याच संघांनी स्वत:चे विलगीकरण केले आहे. पाकिस्तानामध्ये फेब्रुवारीमध्ये PSL ची सुरुवात करण्यात आली होती, पण त्यामध्ये सुद्धा 6 खेळाडूंसह 8 जणांना कोरोनाची लागण झालेली. तेव्हा पाकिस्तानने अचानकचं पीएसएल आहे त्या स्थितीमध्ये बंद करण्याचा निर्णय घेतला. पण, आयपीएलमध्ये 7 खेळाडूना कोरोना संक्रमण झाल्यानंतरही BCCI अजून कसली वाट पाहत आहे असा सवाल सर्व स्तरातून उपस्थित केला जात होता. आयपीएल स्थगित करण्यापूर्वी आयपीएलचे सामने एकाच ठिकाणी मुंबईमधील 3 मैदानांवर खेळविले जाणार अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु, वाढत्या दबावानंतर अखेर आयपीएलचे सीझन १४ सस्पेंड करावा लागला आहे.

ipl cancel out

भारतीय क्रिकेट बोर्डासमोरही सभोवतालच्या या गंभीर परिस्थितीमुळे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. संपूर्ण लीगमध्ये एकूण 61 सामने होणार होते. देशी तसेच अनेक परदेशी खेळाडू आणि त्यांच्या बरोबरची सपोर्ट टीमला आता यशस्वीरित्या मायदेशी पोहोचवण्याची जबाबदारी बीसीसीआयवर आहे. परंतु भारतातील कोरोनाचा कहर पाहता, युएई आणि ऑस्ट्रेलियासह अनेक देशांनी भारतातून येणाऱ्या विमान उड्डाणांवर १५ मे पर्यंत बंदी घातली आहे. बीसीसीआयसमोर अशा परिस्थितीत या सर्व परदेशी खेळाडू आणि स्टाफला सुरक्षीत घरी पाठवणे मोठे आव्हानाचे ठरत आहे. मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल, पंजाब किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद संघांमध्ये सर्वाधिक 8-8 परदेशी खेळाडू संख्या आहे. त्या सोबतच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये 7 आणि राजस्थान रॉयल्समध्ये 6 परदेशी खेळाडू समाविष्ट आहेत. यामध्ये , इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि साउथ आफ्रिकेमधील 50 पेक्षा अधिक खेळाडू समाविष्ट आहेत. तसेच या लीगशी संबंधित बांगलादेश आणि वेस्ट इंडिजमधील खेळाडूही आहेत. खेळाडूच नव्हे तर या सर्व देशांचे 40 पेक्षा अधिक सहाय्यक कर्मचारी आणि कॉमेंट्री करणारा स्टाफही भारतामध्ये उपस्थित आहे.

कोरोनाने भारताला घातलेल्या विळख्यामुळे बर्याच देशांनी आपल्या आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद ठेवल्या आहेत, तसेच भारतातून येणाऱ्या लोकांच्या प्रवेशावर बंदीसह निर्बंध घालण्यात आले आहेत. यामध्ये विशेष करून ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश या राष्ट्रांचा प्रमुख समावेश आहे. त्याचबरोबर, इंग्लंडने देखील भारतामधून इंग्लंडला जाणाऱ्या लोकांसाठी 10 दिवस कडक क्वारंटाईनमध्ये राहण्याचे नियम केला आहे. विविध देशांनी पूर्णत: बंदी घातली नसून काही निर्बंध घातले आहेत. ब्रिटन सरकारने लोकांना ठरविलेल्या हॉटेल्समध्ये क्वारंटाईन करण्याची सुविधा केली आहे तसेच त्यांना दुसर्‍या आणि आठव्या दिवशी कोरोना चाचणी अनिर्वाय केली आहे. युएईने काही दिवसांपूर्वीच आपल्या देशाच्या निर्बंधांवर सवलत दिली होती, परंतु आत्ता त्यांनीही भारतातील कोरोनाचे वाढती रुग्ण संख्या पाहता, 14 मे पर्यंत भारतातून येणाऱ्या विमानप्रवासावर बंदी घातली आहे.

- Advertisment -

Most Popular