Friday, February 26, 2021
Home Lifestyle News अंतराळवीर कल्पना चावला

अंतराळवीर कल्पना चावला

अंतराळात जाणारी कल्पना ही पहिली भारतीय वंशाची अमेरिकी महिला. १७ मार्च १९६२ ला हरियाणातील करनालमध्ये जन्मलेल्या कल्पना चावलाने भारताचं नाव जगामध्ये सोन्याच्या अक्षरात कोरले. वयाच्या २० व्या वर्षी ती मार्स्टर ऑफ सायन्स एरोस्पेस इंजिनीअरिंग हे शिक्षण घ्यायला कल्पना अमेरिकेत गेली होती. दोन वर्षांत तिने हा अभ्यासक्रम पूर्ण केला. ती ज्या कोलंबिया अंतराळयानातून गेली होती ते परतीच्या वेळी १ फेब्रुवारी २००३ ला पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना त्याचा स्फोट झाला आणि यानातील सातही जणांचा मृत्यु झाला. त्यात कल्पनालाचाही मृत्यु झाला. आज त्यांचा १८ वा स्मृतिदिन आहे.

Kalpna Chawala first indian origin lady astronaut

दिवंगत अंतराळवीर कल्पना चावलाच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी १२ मे २००४ ला नासाने एका सुपर कॉम्प्युटरला तिचं नाव दिलं. ECCO फ्रेमवर्कमधील हाय-रिझोल्युशन ओशन अनॅलिसिस करण्याचं काम SGI Altix ३०० हा सुपर कॉम्पुटर करतो. त्याला कल्पना चावलाचं नाव देण्यात आल आहे. कल्पनाला लहानपणापासूनच विज्ञानाबद्दल आकर्षण होतं. तिने पंजाब इंजिनिअरिंग कॉलेजमधून एरोनॉटिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली होती. या विषयातील अधिक अभ्यास करण्याची तिला इच्छा होती. त्यामुळे तिने अमेरिकेत शिक्षण घ्यायला जाण्याचा निर्णय घेतला. शाळेत असताना कल्पनाला कविता आणि नृत्य करण्यात खूपच रस होता. तिला लहानपणापासूनच विमानं आणि आकाशातल्या उड्डाणाबद्दल प्रचंड आकर्षण होतं. त्यामुळे आपल्या वडिलांबरोबर ती स्थानिक फ्लाइंग क्लबमध्येही जायची. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर शिक्षणाच्या झालेल्या प्रसारामुळे देशातील शिक्षणाचा स्तर उंचावला. पण उच्च शिक्षणासाठी परदेशात जावं लागत होतं. आजही अनेक तरुण-तरुणी उच्च शिक्षणासाठी परदेशांत जातात. अशीच ही एक तरुणी वयाच्या विसाव्या वर्षी शिक्षणासाठी भारतातून अमेरिकेत गेली. आपलं बुद्धिकौशल्य आणि कर्तृत्वाच्या बळावर तिने अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेमध्ये म्हणजेच नासा मध्ये  काम केलं. नासाच्या कोलंबिया या यानातून अंतराळात जाण्याचा मान कल्पना चावलाला मिळाला.

चाळीसाव्या वर्षी नासाच्या मोहिमेत मरण पावलेल्या कल्पनाला मरणोत्तर काँग्रेशनल स्पेस मेडल ऑफ ऑनर देऊन गौरवण्यात आलं आणि अमेरिकेतील अनेक रस्ते, विद्यापीठं आणि संस्थांना तिचं नाव देण्यात आलं. तिच्या नावाने अनेक स्कॉलरशीपही सुरू करण्यात आल्या. अमेरिकेतील एरोस्पेस आणि डिफेन्स कंपनी नॉर्थरोप ग्रुमन कंपनीने नव्या अंतराळयानाला कल्पना चावलाचं नाव दिलं आहे. कल्पना चावलाने एका महत्त्वाच्या मिशनमधून परतताना जगाचा निरोप घेतला. पण तिने मृत्युपूर्वीच तिची इच्छा लिहून ठेवली होती. त्याप्रमाणे तिच्या मृतदेहावर अमेरिकेतल्या उताहमधील झिऑन नॅशनल पार्कमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर तिच्या इच्छेनुसार तिच्या अस्थि त्याच पार्कमध्ये विखुरण्यात आल्या.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments