Sunday, March 7, 2021
Home International News डिसले गुरुजींचा क्युआर कोड ग्लोबली स्कॅन ! ७ कोटी रुपयांचा पुरस्कार जाहीर

डिसले गुरुजींचा क्युआर कोड ग्लोबली स्कॅन ! ७ कोटी रुपयांचा पुरस्कार जाहीर

युनेस्को आणि लंडन येथील वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबलटीचर पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूर येथील जिल्हा परिषद शिक्षक रणजितसिंह डिसले यांचे दूरध्वनीवरून केले अभिनंदन केले आहे.

युनेस्को आणि लंडनमधल्या वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी ग्लोबल टीचर पुरस्कार देण्यात येतो. युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ‘ग्लोबल टीचर प्राईज’ आज जाहीर झाला. यात सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील प्राथमिक शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ७ कोटी रुपयांचा हा पुरस्कार जाहीर झाला आहे. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली. असा पुरस्कार मिळणारे रणजितसिंह पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत. जगभरातील १४० देशांतील १२ हजारहुन अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा करण्यात आली आहे. सध्या आपण खूप कठिण काळातून जात आहोत. या काळात चांगलं शिक्षण मिळणं हा मुलांचा जन्मसिद्ध हक्क आहे. त्यामध्ये शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असं डिसले गुरुजी सांगतात. डिसले यांनी शिक्षणामध्ये इंटरनेट आणि तंत्रज्ञानाचा भरपूर वापर करून पुस्तकांमध्ये QR कोडच्या माध्यमातून मुलांना सोप्या भाषेत कसं शिकता येईल यावर अधिक भर दिला आहे. कोणतीही कन्सेप्ट मुलांना क्युआर कोड च्या माध्यमातून सहजगत्या आणि सोप्या पद्धतीने समजेल अशा कृतीशील शिक्षण पद्धतीकडे त्यांचा कल आहे. त्यांनी पाठ्यपुस्तकांमध्ये क्युआर कोड पद्धतीचा अवलंब केलाने सर्वप्रथम मायक्रोसॉफट कंपनीने त्यांची दखल घेतली. डिसले यांना मायक्रोसॉफ्ट फाउंडेशनचा शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार मिळाला होता.

Ranjitsinh Disale won 1 million USD which is given in partnership with UNESCO!

क्यूआर कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रचं नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. QR कोडचा वापर करून मुलांना पुस्तकातील कविता, धडे, अधिक माहिती मिळवता येते, या त्यांच्या कल्पकतेला तो पुरस्कार मिळाला होता.

युनेस्को आणि लंडन येथील वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबलटीचर पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूर येथील जिल्हा परिषद शिक्षक रणजितसिंह डिसले यांचे दूरध्वनीवरून केले अभिनंदन केले आहे. महाराष्ट्राला तुमचा अभिमान वाटतो, या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी डिसले गुरुजींचं कौतुक केलं आहे.

रणजितसिंह डिसले यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले. तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांनी केलेले कार्य देशातीलच नव्हे तर, जगभरातील शिक्षकांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचंही उपमुख्यमंत्री म्हणाले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर झालेले सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजीतसिंह डिसले यांचे अभिनंदन केले आहे. सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील विद्यार्थीप्रिय शिक्षक रणजीतसिंह डिसले यांना लंडनस्थित वर्की फाऊंडेशनच्या विद्यमाने दिला जाणारा १ दशलक्ष डॉलर पुरस्कार रक्कम असलेला ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल डिसले यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. नावीन्यपूर्ण संकल्पना तसेच तंत्रज्ञानाची मदत घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्याचे डिसले यांचे कार्य नक्कीच कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे, असं राज्यपालांनी आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments