मानधनातील तफावत आणि प्रलंबित मागण्यांकडे शासनाने वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील सर्व ग्राम रोजगार सहाय्यकांनी १ फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या संपाला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) कार्यरत असलेल्या कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. २३ जानेवारीपासून राज्यव्यापी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या आंदोलनामुळे ग्रामीण भागातील मनरेगाची कामे थांबणार आहेत. गेल्या ५ ते १० वर्षांपासून ग्राम रोजगार सहाय्यक हे सरपंच, ग्रामसेवक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने गावातील मनरेगाची कामे अतिशय मिळवण्यासाठी सध्यातरी कोणतीही स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. अशी यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी सध्या निविदा प्रक्रियेचे काम सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले; मात्र, ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नागरिकांच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
देवरूखच्या मुख्य बाजारपेठेत भटक्या कुत्र्यांनी नागरिकांवर हल्ला करण्याच्या आतापर्यंत सुमारे चार ते पाच घटना घडल्या आहेत. यामुळे बाजारपेठेतून ये-जा करणारे नागरिक, व्यापारी, नोकरदार वर्ग आणि विशेषतः शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेकदा कुत्री अंगावर धावून येत असल्याने अपघाताचा धोकाही वाढला आहे. नगरपंचायतीने केवळ निविदा प्रक्रियेचे कारण पुढे न करता नागरिकांच्या जीविताचा विचार करून तातडीने यावर उपाययोजना करावी आणि पिसाळलेल्या तसेच भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी संसारे यांनी केली आहे.
