HomeRatnagiriजिल्हा परिषदेवर येऊ शकते शिवसेना-भाजपची सत्ता !

जिल्हा परिषदेवर येऊ शकते शिवसेना-भाजपची सत्ता !

१० जागांपैकी ९ जागी शिवसेना बाजी मारण्याची चिन्हे आहेत

रत्नागिरी जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील ९ नगर पंचायतींसाठी शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडली. सोमवारी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहे. तत्पूर्वी जिल्ह्यात मोठ्या राजकीय उलथापालधीचे संकेत व्यक्त केले जात आहेत. एकेकाळच्या एकसंघ शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात यावेळी उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेची मोठी पडझड होत असल्याचे अंदाज असून शिवसेनेचा शिंदे गट जिल्हा परिषदेत सर्वांत मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. महायुतीच्या माध्यमातून शिवसेना भाजप जिल्हा परिषदेची सत्ता मिळवेल असे अंदाज व्यक्त केले जात आहेत. शिवसेना उबाठाला ८ ते १० जागा मिळण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेवर महायुतीने बहुमत मिळवले तरीही पंचायत समित्यांची निवडणुक महायुतीसाठी सरळ सोपी नसेल. गुहागर, लांजा, देवरुखमध्ये अटीतटीच्या लढतीचे संकेत आहेत तर चिपळुणात अजितदादांची राष्ट्रवादी गेम चेंजर ठरण्याचे अंदाज आहेत. जिल्हा परिषदेच्या एकूण ५६ जागांपैकी एकट्या शिवसेनेला ३० ते ३५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. भाजपला ५ ते ६ जागा मिळू शकतात. शिवसेना भाजप युती. निर्णायक बहुमतासह जिल्हा परिषदेत सत्तेवर येऊ शकते. शिवसेना उबाठाला ८ ते १० जागा मिळण्याचे अंदाज आहेत. राष्ट्रवादीला ६ ते ७ जागा मिळू शकतात तर मनसे जिल्हा परिषदेत खाते खोलू शकते असेही अंदाज आहेत. रत्नागिरीत जिल्हा परिषदेच्या १० जागांपैकी ९ जागी शिवसेना बाजी मारण्याची चिन्हे आहेत. मात्र एका जागी अपक्ष चमत्कार घडवू शकतो असे म्हटले जात आहे.

गोळप गटातून अपक्ष उमेदवार उदय बने यांच्या नावाची चर्चा आहे. पंचायत समितीत २० पैकी १५ ते १६ जागी शिवसेना तर ३ ते ४ जागी उबाठाला संधी दिसत आहे. चिपळूणमध्ये जि.प.च्या ९ पैकी ४ ते ५ जागी राष्ट्रवादी बाजी मारु शकते. शिवसेनेला २ ते ३, उबाठाला १ आणि भाजपला १ जागा मिळण्याचे अंदाज आहेत. पंचायत समितीच्या १८ जागांपैकी राष्ट्रवादीला ९ ते १०, भाजपला ३ ते ४, उबाठाला २ ते ३ तर शिवसेनेला १ ते २ जागा मिळण्याचे अंदाज आहेत. खेडमध्ये जिल्हा परिषदेच्या ८ जागांपैकी शिवसेनेला ५ ते ७जागा मिळू शकतात. उबाठाला १ ते २ तर राष्ट्रवादीलाही १ ते २ जागा मिळण्याची शक्यता आहे. पंचायत समितीच्या १६ जागांपैकी शिवसेनेला १० ते १२, उबाठाला २० ते ३, भाजपला २ तर राष्ट्रवादीला १ जागा मिळण्याचे अंदाज आहेत. ५ गुहागरमध्ये जि.प.च्या जागांपैकी २ उबाठा तर २ महायुतीला जागा मिळू शकतात. एकाजागी भाजप आणि मनसे यांच्यात अटीतटीची लंढत आहे. शृंगारतळीत मनसेच्या प्रमोद गांधी यांच्या नावाची चर्चा आहे. पंचायत समितीच्या १० जागांपैकी ५ उबाठा तर ५ महायुती अशी अटीतटीचल लढत होण्याचे अंदाज आहेत. लांजा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ४ आणि पंचायती समितीच्या ८ जागांवर जोरदार लढती होणार आहेत. इथली लढत उन्नीस बीसची आहे. उबाठा आणि शिवसेना यांना समसमान यश मिळण्याचेही अंदाज आहेत. असेच अंदाज देवरुखम ध्येही आहेत. राजापुरात शिवसेना उबाठा काहीशी आघाडी घेईल असे अंदाज आहेत. मंडणगडमध्येही उन्नीस बीसची लढत होण्याची चिन्हे आहेत.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments