हेन्रिक क्लासेनचा लेकीसोबत रिक्षातून प्रवास; कोट्यवधींचा मालक असूनही साधेपणाची चर्चा

आयपीएल स्टार हेन्रिक क्लासेनचा हैदराबादमधील रिक्षा प्रवासाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.

Must read

सोशल मीडियावर सध्या क्लासेनचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये क्लासेन कोणत्याही आलिशान कारचा लवाजमा न घेता, आपल्या चिमुकल्या लेकीला घेऊन हैदराबादच्या रस्त्यावर रिक्षाने प्रवास करताना दिसत आहे. रणरणत्या उन्हात सामान्य माणसाप्रमाणे रिक्षाने प्रवास करणाऱ्या क्लासेनचा हा साधेपणा पाहून क्रिकेटप्रेमी त्याचे कौतुक करत आहेत.

पैसा असूनही साधेपणाची ओढ आयपीएलमध्ये हैदराबादने क्लासेनला सव्वा पाच कोटी रुपयांना खरेदी केले आहे. याशिवाय जगभरातील इतर क्रिकेट लीग आणि जाहिरातींतून तो वर्षाला कोट्यवधी रुपये कमावतो. इतकी श्रीमंती असतानाही, कोणत्याही बडेजावाशिवाय त्याने केलेला हा रिक्षा प्रवास “श्रीमंती पैशात नाही तर स्वभावात असते,” याची आठवण करून देतो.

मैदानावरही घालतोय धुमाकूळ केवळ साधेपणातच नाही, तर क्लासेन कामगिरीतही अव्वल आहे. नुकत्याच झालेल्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात त्याने ३० चेंडूत नाबाद ६५ धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. या खेळीदरम्यान त्याने वीरेंद्र सेहवागचा आयपीएलमधील सर्वाधिक षटकारांचा विक्रमही मोडीत काढला. सध्या तो या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.

एकूणच काय, तर मैदानावर चेंडू सीमापार धाडणारा क्लासेन खऱ्या आयुष्यात चाहत्यांची मने जिंकण्यातही यशस्वी ठरला आहे.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article