‘तुम्बाड २’ मध्ये आलिया भट्टची एन्ट्री! २० दिवसांचे शूटिंग आणि कथेमध्ये मोठा ट्विस्ट

हस्तरच्या गूढ जगात आता आलिया भट्टचा जलवा; १०० कोटींचे बजेट आणि 'तुम्बाड ३' चे संकेत.

Must read

२० दिवसांचे शूटिंग आणि कथेला कलाटणी देणारी भूमिका पिंकविलाच्या वृत्तानुसार, आलियाने या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवातही केली आहे. ती या चित्रपटासाठी जवळपास २० दिवस शूटिंग करणार आहे. जरी तिचा पडद्यावरील वावर (Screen Time) मर्यादित असला, तरी तिचे पात्र कथेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. आलियाची ही छोटी पण प्रभावी भूमिका चित्रपटाच्या कथानकात मोठे ट्विस्ट घेऊन येईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे पात्र ‘तुम्बाड ३’ ची पायाभरणी करेल, अशी चर्चा चित्रपटसृष्टीत रंगली आहे.

भव्य बजेट आणि तगडी स्टारकास्ट ‘तुम्बाड २’ ची व्याप्ती पहिल्या भागापेक्षा कितीतरी मोठी असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निर्माते हा चित्रपट सुमारे १०० कोटींच्या भव्य बजेटमध्ये तयार करत आहेत. सोहम शाह याच्यासोबतच आता या भागात नवाजुद्दीन सिद्दिकी, निमिषा सजयान आणि आलिया भट्ट यांसारखे दिग्गज कलाकार पाहायला मिळतील. आलियाला या चित्रपटाची पटकथा इतकी आवडली की तिने लगेचच या प्रोजेक्टला होकार दिला.

कधी प्रदर्शित होणार? सध्या आलिया भट्ट ‘अल्फा’ आणि ‘लव्ह अँड वॉर’ सारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. मात्र, ‘तुम्बाड २’ च्या निमित्ताने ती पहिल्यांदाच ‘हॉरर’ जॉनरमध्ये नशीब आजमावणार असल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. हा चित्रपट डिसेंबर २०२७ मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article