HomekonkanChiplunनागरी प्रश्नांसाठी लढा देण्याचा निर्धार चिपळूणमध्ये ठाकरे शिवसेनेचे आत्मचिंतन

नागरी प्रश्नांसाठी लढा देण्याचा निर्धार चिपळूणमध्ये ठाकरे शिवसेनेचे आत्मचिंतन

बैठकीला शहर कार्यकारिणीचे प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या चिपळूण शहर कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक आज झाली. या बैठकीत पक्ष संघटन बळकट करण्यासोबतच निवडणुकीतील यशापयशावर आत्मचिंतन करण्यात आले. तसेच, आगामी काळात नागरिकांच्या प्रश्नांसाठी आक्रमकपणे लढा देण्याचा निर्धार सर्व पदाधिकाऱ्यांनी केला. चिपळूण येथील शिक्षक पतपेढीच्या सभागृहात झालेल्या बैठकीला क्षेत्रप्रमुख महादेव उर्फ बाळा कदम, तालुकाप्रमुख बळीराम गुजर, शहरप्रमुख सचिन उर्फ भैया कदम, तालुका संघटक राजू देवळेकर, महिला शहर संघटिका वैशाली शिंदे आणि युवासेना शहर अधिकारी पार्थ जागुष्टे यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीच्या प्रारंभी चिपळूण नगरपालिकेत निवडून आलेल्या पाचही नवनिर्वाचित नगरसेवकांचा विशेष सत्कार करण्यात आला.

नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत पक्षाला काही ठिकाणी अपेक्षित यश मिळाले नाही. या पार्श्वभूमीवर बैठकीत खुलेपणाने चर्चा करण्यात आली. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी संघटनात्मक पातळीवर राहिलेल्या त्रुटी, भविष्यातील राजकीय आव्हाने आणि करावयाच्या सुधारणा यावर आपली मते मांडली. पराभवाच्या कारणांचा शोध घेत असतानाच मिळालेल्या मतांची टक्केवारी आणि कार्यकत्र्यांर्त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, यावर सखोल विचारमंथन करण्यात आले. हे मार्गदर्शन करताना वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना मरगळ झटकून कामाला लागण्याचे आवाहन केले. या प्रसंगी बाळा कदम व बळीराम गुजर यांनी निवडणुकीचे निकाल काहीही असले तरी जनतेचा आवाज बनणे, ही शिवसेनेची परंपरा आहे.

संघटन मजबूत करा आणि प्रभागातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचा, असे आवाहन केले तर भैया कदम, राजू देवळेकर यांनी नागरिकांशी थेट संपर्क वाढवा. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी केवळ कार्यालयात न बसता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून लढा द्या, अशा सूचना केल्या. चिपळूणच्या नागरिकांच्या प्राथमिक गरजा, शहरातील नागरी सुविधा आणि जनतेचे न्याय्य हक्क यासाठी शिवसेना (उबाठा) पक्ष सातत्याने संघर्ष करेल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला. बैठकीला शहर कार्यकारिणीचे प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही – ज्या प्रभागांमध्ये शिवसेनेचे नगरसेवक निवडून येऊ शकले नाहीत त्या भागातील नागरिकांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. अशा भागातील समस्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या निदर्शनास आणून द्याव्यात. आपण स्वतः त्या प्रश्नांमध्ये लक्ष घालून ते सोडवण्यासाठी पाठपुरावा करू, असे गटप्रमुख मिथिलेश ऊर्फ विकी नरळकर यांनी आश्वासन दिले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments