पुणे-मुंबई मिसिंग लिंकवर देवेंद्र फडणवीसांची ‘ड्राइव्ह’; मर्सिडीज G-Wagen मधून घेतला नव्या रस्त्याचा अनुभव

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे मिसिंग लिंक प्रकल्पाचे लोकार्पण; फडणवीसांनी स्वतः चालवली कार.

Must read

सविस्तर बातमी: पुणे आणि मुंबई या दोन शहरांमधील अंतर कमी करण्यासाठी बांधण्यात आलेल्या बहुप्रतिक्षीत ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अत्यंत दिमाखात पार पडले. हा प्रकल्प केवळ एक रस्ता नसून अभियांत्रिकीचा एक उत्कृष्ट नमुना मानला जात आहे.

या सोहळ्याचे खास आकर्षण ठरले ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचे ड्रायव्हिंग. ‘इन्फ्रामॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फडणवीसांनी स्वतः मर्सिडीज जी-वॅगन या लक्झरी एसयूव्हीचे स्टेअरिंग हातात घेतले आणि या सुस्साट रोडवर गाडी धावली. यावेळी त्यांच्यासोबत गाडीत इतर मान्यवरही उपस्थित होते. या प्रवासादरम्यान फडणवीसांच्या चेहऱ्यावर प्रकल्पाच्या यशाचा आनंद स्पष्टपणे झळकत होता.

या प्रकल्पाबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की, “हा आता केवळ ‘मिसिंग लिंक’ राहिलेला नसून तो मुंबई आणि पुण्याला जोडणारा ‘कनेक्टिंग लिंक’ ठरला आहे.” या मार्गामुळे खंडाळ्याच्या घाटातील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार असून प्रवासाचा वेळही मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article