वकिलाच्या घरातून ७ लाखांचा ऐवज पळविला कोंडगावात घरफोडी

देवरूख पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Must read

पुण्यात वकिली व्यवसाय करणाऱ्या व मूळ गाव कोंडगाव केतकर गल्ली (ता. संगमेश्वर) येथील वकिलाच्या घरात चोरट्याने घरफोडी केली. घराचा मुख्य दरवाजा तोडून सोन्याचे दागिने, रोकड तसेच तांबा-पितळेची भांडी, संगणक असा ७ लाख ६२ हजार ७०० रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला. याप्रकरणी देवरूख पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ३१ डिसेंबर २०२५ ते ३ जानेवारी २०२६ दुपारी साडेतीनच्या सुमारास कोंडगाव केतकरगल्ली येथे घडली. मिळालेल्या पोलिसांकडून माहितीनुसार, फिर्यादी सुबोध मोरेश्वर जोगळेकर (वय ५३, मूळ रा. कोंडगाव केतकर गल्ली, ता. संगमेश्वर, सध्या रा. मु. पो. कोडनपूर, ता. हवेली, जि. पुणे) यांचे मूळ गावात कोंडगाव केतकर गल्लीत घर आहे. बंद घराचा फायदा घेऊन चोरट्याने घराचा मागील दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.

घरातील देवघरातील व बेडरूमधील कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोकड ५ लाख, तांबा, पितळ, स्टील भांडी, संगणक साहित्याची चोरी केली. यामध्ये ७५ हजारांची एक २० ग्रॅमची सोन्याची अंगठी, १ लाखाचे एक २० ग्रॅमची सोन्याची चेन, २० हजारांचे एकूपा ६ चांदीचे गोळे, त्याचे प्रत्येक वजन ५० ग्रॅम एकूण वजन ३०० ग्रॅम, १० हजार रुपयांचे पितळेच्या प्रत्येकी ८ किलो वजनाच्या समई व इतर साहित्य, ५० हजार रुपयांचे तांब्याचे ताम्हण, कलश, ६ कळशा, ४ बादल्या, ३ मोठे हांडे, वजन अंदाजे ४०० किलो, ५ हजारांची स्टीलची ५० ताटे, ५० वाट्या, १२ तांबे. २०० रुपयांचे लहान गॅसबत्ती, ६ पत्र्याचे कंदील, ५०० रुपयाचे एकूण १२ लोखंडी लामन दिवे, २ कुऱ्हाड, ४ कुदळ, फावडी ६, लोखंडी विळे ४, कोयते २, हांडे २, पहार १ नेपाळी सुरा, लोखंडी कुकरी ५०० रुपये, कॉम्प्युटर, प्रिंटर, इन्व्हर्टर, युपीएस, बॅटरी, १ टीव्हीच्या बाहेरून जोडता येणाऱ्या ४ हार्डडिस्क, १ हजार रुपयांची १ गॅस शेगडी, २ लहान व २ मोठे सिलिंडर टाक्या त्याची किंमत ५०० रुपये, १ शिलाई मशीनचा खालील भाग, १ पाण्याची अर्धा हॉर्सपॉवर मोटर असा एकूण ७ लाख ६२ हजारांचा ऐवज चोरट्यांनी पळवला. याप्रकरणी अॅड. सुबोद जोगळेकर यांनी देवरूख पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास देवरूख पोलिस अंमलदार करत आहेत.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article