एसटीतही दिव्यांग कार्डाची होणार पडताळणी

दोषी आढळल्यास गुन्हा दाखल होऊन तुरुंगाची हवाई खावी लागू शकते.

Must read

एसटी बसमध्ये प्रवाशाला विविध सवलती दिल्या जातात, ज्येष्ठ नागरिक महिला तसेच विद्यार्थ्यांसाठी अर्ध्या तिकिटासह सवलत दिली जाते असे, असतानाही काही जणांनी बनावट दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणून ओळखपत्र तयार केली आहेत. आता या ओळखपत्रांची ओळख पटवावी लागेल, तसा आदेश राज्य परिवहन महामंडळाने दिला आहे. दोषी आढळल्यास गुन्हा दाखल होऊन तुरुंगाची हवाई खावी लागू शकते. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ तसेच शासन स्तरावरून वेळोवेळी निर्गमित आदेशानुसार राज्यपरिवहन म हामंडळामार्फत दिव्यांग व्यक्तींना प्रथम सवलतीचा लाभ दिला जातो, पात्र दिव्यांग व्यक्तींनाच सवलतीचा लाभ मिळावा, या दृष्टीने पडताळणी प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबवण्याचे परिपत्रक राज्य परिवहन मंडळाने गुरुवारी २२ जानेवारी रोजी जाहीर केले आहे.

याबाबत दिलेल्या आदेशात राज्यपरिवहन महामंडळामार्फत दिव्यांगत्व प्रमाणपत्राच्या आधारे प्रवास सवलतीचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग व्यक्तीच्या दिव्यांगत्व ओळखपत्राची तपासणी करण्यासाठी वाहक तिकीट तपासणी यांनी मोबाईल अॅप्लिकेशन मोबाईलमध्ये डाऊनलोड करावे या मोबाईल प्लिकेशन मध्ये दिव्यांग व्यक्तीच्या वैश्विक दिव्यांग ओळखपत्राचा क्रमांक व जन्मदिनांक नमूद करून वश्विक दिव्यांग ओळखपत्राचा वैधतेची पडताळणी करावी पडताळणीअंती ओळखपत्र वहीत असल्यास संबंधितांना लाभ देण्यात यावा तथापि ओळखपत्र बनावट अवैध अथवा चुकीचे आढळून आल्यास दिव्यांग व्यक्ती हक अधिनियम २०१६ च्या कलम ९१ नुसार गुन्हा दाखल करावा.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article