कप्तान वेब सीरिज रिव्ह्यू: ॲमेझॉन एमएक्स प्लेयरवर ‘या’ क्राईम थ्रिलरचा दबदबा

माफिया, राजकारण आणि हाय-व्होल्टेज ड्रामा; साकिब सलीमच्या 'कप्तान'ची ओटीटीवर हवा.

Must read

आजकाल ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर दररोज नवनवीन वेब सीरिज रिलीज होत असतात. मात्र, काही मोजक्याच सीरिज प्रेक्षकांच्या मनात घर करतात. सध्या अशीच एक ‘क्राईम-थ्रिलर’ सीरिज सोशल मीडिया आणि ओटीटीवर चर्चेचा विषय ठरत आहे, ती म्हणजे ‘कप्तान’ (Kaptan). ॲमेझॉन एमएक्स प्लेयर (Amazon MX Player) वर रिलीज झालेली ही सीरिज गेल्या महिनाभरापासून टॉप-१० ट्रेंडिंगमध्ये आपली जागा टिकवून आहे.

काय आहे सीरिजची कथा? ‘कप्तान’ची कथा उत्तर प्रदेशातील ‘जवालाबाद’ या काल्पनिक शहराभोवती फिरते. हे शहर सत्तेचा खेळ, भ्रष्टाचार आणि माफियांच्या दहशतीने ग्रासलेले आहे. शहराचा मुख्य व्यवसाय आहे – बनावट दारूचा धंदा. या व्यवसायातील १८० कोटींच्या टेंडरवर कब्जा मिळवण्यासाठी ‘शाहीन’ आणि ‘मुन्ना’ या दोन गटांमध्ये रक्तरंजित संघर्ष सुरू होतो.

या संघर्षात केवळ गुंडच नाही, तर भ्रष्ट राजकारणी आणि पोलीस यंत्रणेचे धागेदोरेही गुंतलेले आहेत. या सत्तेच्या संघर्षात कोण बाजी मारणार? कबीर आणि समरदीप यांच्यातील गुपिते काय आहेत? या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला १० भागांच्या या सीरिजमध्ये मिळतील.

तगडी स्टारकास्ट आणि चित्तथरारक अनुभव या सीरिजमध्ये अभिनेता साकिब सलीम मुख्य भूमिकेत असून त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. साकिबसोबतच सिद्धार्थ निगम, अंजुम शर्मा, कविता कौशिक, वरुण बडोला आणि पूजा गोर यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या यात महत्त्वाच्या भूमिका आहेत. प्रत्येक एपिसोडमध्ये येणारे सस्पेन्स आणि थ्रिल प्रेक्षकांचे डोकं चक्रावून सोडणारे आहे.

आयएमडीबी (IMDb) वर या सीरिजला ६/१० रेटिंग मिळाले असून, सस्पेन्स आणि क्राईम ड्रामा आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी ही एक पर्वणीच ठरत आहे.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article