IND vs AFG Test Squad: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडिया सज्ज; पहा संभाव्य संघ!

शुभमन गिल करणार नेतृत्व? पडिक्कल आणि आकिब नबीला संधी, तर बुमराहला विश्रांती मिळण्याची शक्यता.

Must read

नवी दिल्ली: आयपीएल २०२६ चा धमाका संपल्यानंतर क्रिकेटप्रेमींना आता वेध लागले आहेत ते भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील आगामी कसोटी सामन्याचे. ६ जून ते १० जून दरम्यान न्यू चंदीगड येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा ऐतिहासिक सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात मोठे फेरबदल होण्याची शक्यता असून, अनेक अनुभवी खेळाडूंसोबतच नव्या दमाच्या खेळाडूंना संधी मिळण्याची चिन्हे आहेत.

नेतृत्वाची धुरा शुभमन गिलच्या खांद्यावर? सूत्रांच्या माहितीनुसार, या कसोटी सामन्यासाठी शुभमन गिलकडे भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते. नियमित वरिष्ठ खेळाडूंना वर्कलोड मॅनेजमेंटअंतर्गत विश्रांती देण्याचा विचार निवड समिती करत होती, मात्र फिटनेस चाचणीत सकारात्मक अहवाल मिळाल्यामुळे आता एक मजबूत संघ मैदानात उतरवण्याची तयारी सुरू आहे.

सलामीची जोडी आणि मधली फळी सलामीसाठी केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल ही जोडी सज्ज असेल, अशी दाट शक्यता आहे. तर यष्टिरक्षक फलंदाज म्हणून ऋषभ पंतचे पुनरागमन संघाची ताकद वाढवणारे ठरेल. मधल्या फळीत देवदत्त पडिक्कलला साई सुदर्शनच्या जागी संधी मिळू शकते. पडिक्कलने रणजी ट्रॉफीमध्ये खोऱ्याने धावा ओढल्या असून त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे फळ त्याला या कसोटीच्या निमित्ताने मिळू शकते.

गोलंदाजीत मोठा बदल: बुमराहला विश्रांती भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला आगामी महत्त्वाच्या मालिकांच्या पार्श्वभूमीवर विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. त्याच्या अनुपस्थितीत मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांच्यावर वेगवान गोलंदाजीची मदार असेल. विशेष म्हणजे, देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकलेला युवा गोलंदाज आकिब नबी याला पहिल्यांदाच भारतीय संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भारताचा संभाव्य संघ: शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकिब नबी, हर्ष दुबे, मोहम्मद शमी आणि अंशुल कंबोज.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article