HomekonkanChiplunअवैध वाळू उत्खननावर कारवाई, सक्शन पंप जप्त

अवैध वाळू उत्खननावर कारवाई, सक्शन पंप जप्त

अनधिकृत व्यवसायाकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला होता.

तालुक्यातील केतकी करंबवणे खाडीत बेकायदेशीर वाळू उत्खननावर महूसल विभागाने कारवाई केली. खाडीतील दोन सक्शन पंप या पथकाने जप्त केले आहेत. या खाडीत ड्रेझरला मान्यता असताना सक्शन पंपाद्वारे वाळू उपसा केला जात असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या पथकाने ही कारवाई केली. तालुक्यातील केतकी करंबवणे खाडीत वाळू उपशासाठी दोन-तीन महिन्यांपूर्वीच डेझरला परवानगी देण्यात आली होती. या खाडीत हातपाटी आणि संक्शन पंपाने वाळू उपसा करण्यास बंदी आहे; मात्र गेल्या काही दिवसांपासून येथील खाडीत रात्रीच्यावेळी सक्शन पंपाद्वारे वाळू उत्खननाचे प्रकार सुरू होते. रात्रीस खेळ चालणाऱ्या या अनधिकृत व्यवसायाकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला होता. बेकायदेशीर उत्खननामुळे शासनाचा महसूल बुडवला जात असून, अनधिकृत व्यावसायिकांचे उखळ पांढरे झाल्याची चचदिखील झाली. ज्या व्यावसायिकांनी लिलावाद्वारे वाळू उपसाची परवानगी घेतली त्यांच्यावर अन्याय होत असल्याच्या तक्रारी झाल्या.

अखेर अवैध वाळू उत्खननावर ओरड झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या पथकाने केतकी, करंबवणे खाडीत छापा टाकला. या कारवाईत दोन ठिकाणी सक्शन पंप बेवारस स्थितीत आढळून आले. हे सक्शन पंप नेमके कोणाचे, याचा अद्याप उलगडा झालेला नाही. सध्याच्या स्थितीला हे सक्शन पंप जप्त केले असून, पुढील कारवाई महसूल विभागामार्फत सुरू आहे. अवैधरित्या वाळू उत्खननाचा प्रयत्न झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाते. कोणालाही पाठीशी घातले जात नसल्याचे तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी सांगितले. यापुढेही खाडीत वाळूउपशासाठी सक्शन पंप आढळल्यास ते जप्त केले जाणार असल्याचे तहसीलदारांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments