बारामती पोटनिवडणूक निकाल २०२६: सुनेत्रा पवारांची ६५०० मतांनी आघाडी; बिचुकले-करुणा मुंडेंची पिछाडी

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांचा बोलबाला, पहिल्या फेरीचे अधिकृत आकडे समोर.

Must read

दिग्गज उमेदवारांची स्थिती काय? या निवडणुकीत केवळ राजकीय पक्षांचे उमेदवारच नव्हे, तर काही चर्चेतील चेहरेही नशीब आजमावत होते. मात्र, मतदारांनी त्यांना सपशेल नाकारल्याचे चित्र पहिल्या फेरीत तरी दिसत आहे. वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारे अभिजीत बिचुकले यांना पहिल्या फेरीत केवळ ७ मतं मिळाली आहेत. तर, धनंजय मुंडे यांच्याशी असलेल्या कौटुंबिक वादामुळे चर्चेत आलेल्या करुणा मुंडे यांना केवळ १० मतं घेता आली आहेत. या आकडेवारीवरून बारामतीच्या मतदारांनी प्रस्थापित नेतृत्वावरच आपला विश्वास कायम ठेवल्याचे दिसून येत आहे.

मतमोजणीचा थरार सुरूच: सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच बारामती केंद्राबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे. सुनेत्रा पवार यांनी घेतलेली ६,५०० मतांची ही आघाडी पुढील फेऱ्यांमध्ये कायम राहते की वाढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विरोधकांनीही जोर लावला असला तरी पहिल्या फेरीचे आकडे सुनेत्रा पवार यांच्यासाठी सुखावणारे आहेत.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article