तमिळनाडू निवडणूक निकाल २०२६: थलपती विजयचा धमाका, किंगमेकर ठरणार की किंग?

सुपरस्टार विजयच्या TVK पक्षाची दमदार एन्ट्री, दोन्ही मतदारसंघांत चुरशीची लढत.

Must read

स्वतः विजय रिंगणात असलेल्या मतदारसंघांची स्थिती: थळपती विजयने स्वतः तिरुची (पूर्व) आणि पेरांबूर या दोन महत्त्वाच्या मतदारसंघांतून नशीब आजमावले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही जागांवरून अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. तिरुची पूर्वमध्ये विजय आघाडीवर असून त्यांनी प्रस्थापित नेत्यांना घाम फोडला आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे राजकीय विश्लेषक थक्क झाले असून, एका अभिनेत्याचा राजकीय प्रवास इतक्या वेगाने यशाकडे वळेल अशी कोणालाही अपेक्षा नव्हती.

काय सांगत आहेत सुरुवातीचे कल? सुरुवातीच्या कलांनुसार, तामिळनाडूमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. एका बाजूला मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांची सत्ता टिकवण्यासाठी धडपड सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला अण्णाद्रमुकने आपली ताकद पणाला लावली आहे. मात्र, या दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ या उक्तीप्रमाणे विजय यांच्या TVK पक्षाने अनेक ठिकाणी आघाडी घेतली आहे. काही मतदारसंघांत तर TVK ने अण्णाद्रमुकला चक्क तिसऱ्या क्रमांकावर ढकलले आहे.

तरुण मतदारांची ‘थलपती’ला साथ? विजय यांच्या सभांना मिळणारी प्रचंड गर्दी आणि विशेषतः तरुणांचा त्यांना असलेला पाठिंबा याचे रूपांतर आता मतांमध्ये होताना दिसत आहे. घराणेशाहीच्या राजकारणाला फाटा देत आपल्या ड्रायव्हरच्या मुलाला उमेदवारी देण्यासारख्या धाडसी निर्णयामुळे विजय यांनी सर्वसामान्यांची मने जिंकली आहेत.

आता प्रश्न उरतो की, विजय केवळ किंगमेकरची भूमिका बजावणार की तमिळनाडूच्या राजकारणाचे सूत्रे स्वतःच्या हातात घेणार? दुपारपर्यंतचे चित्र अधिक स्पष्ट होईल, पण एक गोष्ट नक्की की तमिळनाडूच्या राजकारणात आता ‘विजय पर्व’ सुरू झाले आहे.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article