HomeRatnagiriटीओडी मीटर वापरणाऱ्या वीज ग्राहकांना ९१ लाख ४८ हजाराची सवलत

टीओडी मीटर वापरणाऱ्या वीज ग्राहकांना ९१ लाख ४८ हजाराची सवलत

महावितरणकडून हे स्मार्ट टीओडी मीटर ग्राहकांकडे मोफत लावण्यात येत आहेत.

महावितरणकडून राज्यातील घरगुती वीजग्राहकांसाठी स्मार्ट टीओडी म ीटरच्या माध्यमातून दिवसाच्या वीज वापरामध्ये प्रतियुनिट ८० पैसे ते १ रुपया सवलत देण्यात येत आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुढील पाच वर्षासाठी निश्चित केलेल्या वीजदरानुसार घरगुती ग्राहकांना टीओडीप्रमाणे वीज दरात सवलत दि. १ जुलै २०२५ पासून सुरु आहे. या अंतर्गत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १ लाख ४५ हजार ४०४ वीज ग्राहकांना जुलै ते डिसेंबर या सहा महिन्यांत एकूण ९१ लाख ४८ हजार इतक्या रुपयांची सवलत मिळाली आहे. महावितरणकडून हे स्मार्ट टीओडी मीटर ग्राहकांकडे मोफत लावण्यात येत आहेत. स्मार्ट टीओडी मीटरमुळे रत्नागिरी जिल्ह्यात माहे जुलै महिन्यात ४८. हजार ४८१ ग्राहकांना ३ लाख २० हजारांची, ऑगस्ट महिन्यात ९१ हजार ३६० ग्राहकांना ११ लाख ८१ हजारांची, सप्टेंबर महिन्यात १ लाख १० हजार १३५ ग्राहकांना १५ लाख ४६ हजारांची, ऑक्टोंबर महिन्यात १ लाख १ हजार ५३१ ग्राहकांना १२. लाख २९ हजारांची, नोव्हेंबर महिन्यात १ लाख ४ हजार १२२ ग्राहकांना १३ लाख २७ हजारांची तर डिसेंबर महिन्यात १ लाख ५ हजार ७७५ ग्राहकांना ११ लाख ३५ हजारांची वीजदर सवलत मिळाली आहे. जिल्ह्यातील वीज ग्राहकांना सहा महिन्यात एकूण ६७ लाख ४१ हजार रुपयांची सवलत मिळाली आहे.

३६ सिंधुदुर्ग जिल्ह्यात माहे जुलै महिन्यात १२ हजार १२५ ग्राहकांना ६७ हजारांची, ऑगस्ट महिन्यात ३१ हजार ७७२ ग्राहकांना ३ लाख ९७हजारांची, सप्टेंबर महिन्यात हजार ९३८ ग्राहकांना ५ लाख ४८ हजारांची, ऑक्टोंबर महिन्यात ३६ हजार ७ ग्राहकांना ४ लाख ४१ हजारांची, नोव्हेंबर महिन्यात ३७हजार ७९० ग्राहकांना ४ लाख ९१ हजारांची तर डिसेंबर महिन्यात ३९ हजार ६२९ ग्राहकांना ४ लाख ६० हजारांची वीजदर सवलत मिळाली आहे. जिल्ह्यातील वीज ग्राहकांना सहा महिन्यात एकूण २४ लाख ७ हजार रुपयांची सवलत मिळाली आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या मीटरमधून स्वयंचलित मासिक रीडिंग होत असल्याने अचूक बिले मिळतात. घसतील विजेचा वापर दर एक तासाला संबंधित ग्राहकांना मोबाईलवर पाहता येते. त्यामुळे वीज वापरावर देखील ग्राहकांचे थेट नियंत्रण राहणार आहे. टाईम ऑफ डे प्रणालीनुसार वीज वापराच्या कालावधीनुसार दर आकारणी केली जाते. औद्योगिकनंतर घरगुती ग्राहकांना प्रथमच स्वस्त वीज दरासाठी टीओडी प्रमाणे आकारणी सन सुरू झाली आहे. २०२५ ते २०३० या पाच वर्षांसाठी आयोगाने घरगुती ग्राहकांसाठी टाईम ऑफ डे (टीओडी) नुसार सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वापरलेल्या विजेसाठी प्रतियुनिट ८० पैसे ते १ रुपया सवलत मंजूर केली आहे. यात दि. १ जुलै २०२५ ते मार्च २०२६ मध्ये ८० पैसे, सन २०२७ मध्ये ८५, सन २०२८ व २९ मध्ये ९० पैसे तसेच सन २०३० मध्ये १ रुपये प्रतियुनिट सवलत मिळणार आहे.

सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वीजग्राहक घरातील प्रामुख्याने वॉशिंग मशीन, गिझर, इस्त्री, एअर कंडिशनर व जास्त वीज वापर असणाऱ्या इतर उपकरणांचा वापर करू शकतात. त्यात टीओडी मीटरमुळे ग्राहकांचा मोठा आधिक फायदा होणार आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी टीओडी मीटर घरगुती ग्राहकांकडे बसविणे आवश्यक आहे. स्मार्ट टीओडी मीटरचे मासिक रीडिंग स्वयंचलित होणार आहे. कोणताही मानवी हस्तक्षेप नसल्याने बिलिंगच्या तक्रारी जवळपास संपुष्टात येणार आहे. तसेच घरात किती वीज वापरली? याची माहिती सर्व माहिती संबंधित ग्राहकाच्या मोबाईल अॅपवर उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे योग्य वीज वापराचे नियोजन करता येईल. यासह ज्यांच्याकडे छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प आहे, त्यातून वापरलेल्या व शिल्लक राहिलेल्या विजेचा लेखाजोगा ठेवणे हे या स्मार्ट टीओडी मीटरचे प्रमुख फायदे आहे. या नव्या मीटरचा कोणताही आर्थिक भुर्दंड ग्राहकांवर नाही. स्मार्ट टीओडी मीटर हे प्रीपेड नाही तर पोस्टपेड आहे. म्हणजे आधी वीज वापरा मग मासिक बिल भरा, अशी सध्याची मासिक बिलिंग पद्धत पुढेही राहणार असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments