क्रूझ शिपवर हंता व्हायरसचा उद्रेक; ३ प्रवाशांचा मृत्यू, ‘या’ कारणामुळे कोरोनापेक्षाही घातक.

अटलांटिक महासागरातील एमव्ही होंडियस जहाजावर मृत्यूचे थैमान; प्रवाशांना जहाजावरच रोखले.

Must read

सध्या संपूर्ण जगात एका नव्या आरोग्य संकटामुळे खळबळ उडाली आहे. अटलांटिक महासागराच्या मधोमध प्रवास करणाऱ्या ‘एमव्ही होंडियस’ (MV Hondius) या आलिशान क्रूझ शिपवर ‘हंताव्हायरस’ (Hantavirus) पसरल्याची भीती व्यक्त होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या जहाजावरील तीन प्रवाशांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून, इतर तीन जण गंभीर आजारी आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून हे जहाज आफ्रिकेतील केप वर्डे बेटाच्या किनाऱ्यावर थांबवण्यात आले असून, एकाही प्रवाशाला खाली उतरण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.

नेमकी घटना काय? हे जहाज २० मार्च रोजी अर्जेंटिनाहून निघाले होते आणि दक्षिण ध्रुवाचा प्रवास करून युरोपच्या दिशेने जात होते. मात्र, प्रवासादरम्यान प्रवाशांना तापासारखी लक्षणे दिसू लागली. ७० वर्षांच्या एका प्रवाशाचा जहाजावरच मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या पत्नीचाही दक्षिण आफ्रिकेत पोहोचल्यावर मृत्यू झाला. तिसऱ्या मृताचा देह अजूनही जहाजावरच आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, जहाजावरील १७० प्रवासी आणि ७१ क्रू मेंबर्स सध्या दहशतीच्या छायेत आहेत.

काय आहे हा हंताव्हायरस? तज्ज्ञांच्या मते, हंताव्हायरस हा प्रामुख्याने उंदीर किंवा खारींच्या विष्ठा, लघवी आणि लाळेच्या संपर्कात आल्याने माणसाला होतो. जर जहाजावर उंदरांचा वावर असेल, तर तिथूनच हा संसर्ग पसरला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.

हा आजार कोरोनापेक्षा घातक का? १. मृत्यू दर: कोरोनाच्या तुलनेत हंताव्हायरसचा मृत्यू दर खूप जास्त आहे. यातील ‘अराराक्वॉरा’ या स्ट्रेनचा मृत्यू दर चक्क ५४% इतका आहे. २. लस उपलब्ध नाही: कोरोनावर लस उपलब्ध आहे, पण हंताव्हायरसवर अद्याप कोणतीही लस किंवा खात्रीशीर औषध उपलब्ध नाही. ३. कसा पसरतो: हा आजार हवेतून पसरत नसला तरी, उंदरांनी स्पर्श केलेल्या वस्तू किंवा अन्नावाटे तो शरीरात शिरकाव करतो.

सध्या दक्षिण आफ्रिकेचे आरोग्य विभाग आणि WHO या प्रकरणाचा तपास करत आहेत. जोपर्यंत सर्व प्रवाशांची चाचणी होत नाही आणि धोका टळत नाही, तोपर्यंत कोणालाही किनाऱ्यावर उतरू दिले जाणार नाही.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article