कन्नड अभिनेता दिलीप राज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या ४७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

चित्रपट आणि मालिका विश्वातील अष्टपैलू व्यक्तिमत्व हरपले; चाहत्यांकडून श्रद्धांजली.

Must read

नेमकं काय घडलं? मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप राज काही दिवसांपूर्वी गोव्याला गेले होते. तिथे असतानाच त्यांना छातीत दुखण्याचा त्रास जाणवू लागला होता. त्यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन बंगळुरूला परतल्यावर डॉक्टरांची अपॉइंटमेंटही घेतली होती. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते. बुधवारी पहाटे त्यांना पुन्हा एकदा छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, पण उपचारांपूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. एका उमद्या कलाकाराचा असा अचानक झालेला अंत चाहत्यांच्या काळजाला घर पाडून गेला आहे.

एक यशस्वी कारकीर्द दिलीप राज यांनी केवळ अभिनयातच नाही, तर निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रातही आपला ठसा उमटवला होता. २००७ मध्ये आलेल्या ‘मिलना’ या चित्रपटामुळे त्यांना खरी ओळख मिळाली. या चित्रपटात त्यांनी दिवंगत सुपरस्टार पुनीत राजकुमार यांच्यासोबत काम केले होते. याशिवाय ‘यू टर्न’ आणि ‘बॉयफ्रेंड’ सारख्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिकांचे विशेष कौतुक झाले. मालिका विश्वातही ‘हिटलर कल्याण’ या मालिकेतील त्यांच्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली होती. ‘डीआर क्रिएशन्स’ या स्वतःच्या निर्मिती संस्थेद्वारे त्यांनी अनेक दर्जेदार मालिकांची निर्मिती केली होती.

दिलीप राज यांच्या पश्चात त्यांची पत्नी श्रीविद्या आणि दोन मुली असा परिवार आहे. एका प्रतिभावान कलाकाराच्या जाण्याने कन्नड सिनेसृष्टीचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article