प्रत्येक मराठी मनामध्ये स्वाभिमानाचा हुंकार जागवणारा दिवस म्हणजे ‘१ मे – महाराष्ट्र दिन’. १ मे १९६० रोजी आपला महाराष्ट्र स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात आला आणि तेव्हापासून हा दिवस केवळ राज्याचा वर्धापन दिन न राहता, मराठी अस्मितेचा आणि संस्कृतीचा उत्सव बनला आहे.
यंदाच्या महाराष्ट्र दिनानिमित्त (Maharashtra Day 2026), आपल्या मातीचे ऋण व्यक्त करण्यासाठी आणि प्रियजनांना या ऐतिहासिक दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही काही खास शुभेच्छा संदेश आणि कविता घेऊन आलो आहोत. हे मेसेज तुम्ही व्हॉट्सॲप स्टेटस (WhatsApp Status), फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर शेअर करून महाराष्ट्राचा जयजयकार करू शकता.
यंदाच्या महाराष्ट्र दिनासाठी खास शुभेच्छा संदेश:
१. संतांची आणि प्रगतीची भूमी: “ज्ञानाच्या देशा, प्रगतीच्या देशा आणि संताच्या देशा, महाराष्ट्र दिनाच्या माझ्या सर्व मराठी बांधवांना मनापासून शुभेच्छा…!”
२. महाराष्ट्र गीताचा अभिमान: “बहु असोत सुंदर संपन्न की महा… प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा… जय महाराष्ट्र! महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”
३. सह्याद्रीचा गर्जना: “सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा… दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा… जय जय महाराष्ट्र माझा!”
४. मराठी अस्मिता: “मराठी भाषा, मराठी मन, अभिमान महाराष्ट्राचा, स्वाभिमान मराठीचा…!! महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!”
५. मातीचे नाते: “दगड होईन तर सह्याद्रीचा होईन, माती झालो तर महाराष्ट्राची होईन, तलवार झालो तर आई भवानीची होईन! जय भवानी, जय शिवाजी!”
या मंगल दिनी केवळ संदेश पाठवूनच नव्हे, तर महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि समृद्ध संस्कृतीच्या संवर्धनासाठी आपण सर्वांनी संकल्प करूया. चला तर मग, शिवरायांच्या या पावन भूमीला वंदन करूया आणि अभिमानाने म्हणूया – जय महाराष्ट्र!
