नेहा शर्माची इंस्टाग्रामवरून मोठी कमाई; महिन्याला कमावतेय २९ लाख रुपये!

राजकारणी अजित शर्मा यांची मुलगा नेहा शर्मा सोशल मीडिया सबस्क्रिप्शनमुळे चर्चेत.

Must read

बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्री आणि बिहारचे दिग्गज नेते अजित शर्मा यांची कन्या नेहा शर्मा सध्या तिच्या चित्रपटांमुळे नाही, तर तिच्या डिजिटल कमाईमुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडिया हे केवळ फोटो शेअर करण्याचे माध्यम न राहता कमाईचे मोठे साधन बनले आहे, हे नेहाने सिद्ध करून दाखवले आहे.

नेमके प्रकरण काय आहे? नेहा शर्माने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ‘पेड सबस्क्रिप्शन’ (Paid Subscription) ही नवी सुविधा सुरू केली आहे. ज्या चाहत्यांना नेहाचे ‘Exclusive’ फोटो, व्हिडिओ आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स पाहायचे आहेत, त्यांना दरमहा ठराविक शुल्क भरावे लागते. नेहाने यासाठी प्रति महिना २९९ रुपये इतकी फी ठेवली आहे.

कमाईचा आकडा थक्क करणारा! मिळालेल्या माहितीनुसार, नेहाच्या या सबस्क्रिप्शन प्लॅनला चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सध्या तिचे जवळपास १०,००० पेक्षा जास्त पेड सबस्क्राइबर्स आहेत. जर आपण गणित मांडले, तर २९९ रुपये गुणिले १०,००० युजर्स या हिशोबाने नेहा केवळ इंस्टाग्राम सबस्क्रिप्शनमधून महिन्याला २९ ते ३० लाख रुपये कमावत आहे.

काय पाहायला मिळते या सबस्क्रिप्शनमध्ये? या प्लॅनअंतर्गत नेहा तिच्या चाहत्यांसाठी विशेष रिल्स, बिहाईंड द सीन (BTS) व्हिडिओ आणि अशा काही खास पोस्ट शेअर करते ज्या सामान्य फॉलोअर्सना दिसत नाहीत. आतापर्यंत तिने ५५० हून अधिक स्टोरीज आणि अनेक रिल्स केवळ तिच्या सबस्क्राइबर्ससाठी शेअर केल्या आहेत.

नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया एकीकडे नेहाच्या या व्यवसायाची चर्चा होत असताना, दुसरीकडे तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागत आहे. काही नेटकऱ्यांनी याला ‘ओनली फॅन्स’ (OnlyFans) ची लाइट आवृत्ती म्हटले आहे, तर काहींनी “चित्रपटात काम मिळत नसल्यामुळे हे मार्ग निवडावे लागत आहेत,” अशी टीका केली आहे. मात्र, तिचे कट्टर चाहते या सुविधेचे समर्थन करत असून, आपल्या आवडत्या अभिनेत्रीशी कनेक्ट राहण्याचा हा उत्तम मार्ग असल्याचे सांगत आहेत.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article