रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी १५ जानेवारीला दापोली पोलिस ठाण्याला भेट देऊन ‘वार्षिक निरीक्षण’ तपासणी केली. या दौऱ्यात त्यांनी केवळ पोलिस कामकाजाचा आढावाच घेतला नाही, तर स्थानिक नागरिक आणि पोलिस पाटील यांच्याशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासोबतच अमली पदार्थमुक्त समाजासाठी ‘मिशन फिनिक्स’ प्रभावीपणे राबवण्याचे आदेश त्यांनी या वेळी दिले. वार्षिक निरीक्षणादरम्यान पोलिस अधीक्षकांनी पोलिस ठाण्यातील विविध विभागांची बारकाईने पाहणी केली. या मध्ये प्रामुख्याने गुन्ह्यांची स्थिती, दाखल गुन्हाांचा सद्यःस्थिती अहवाल आणि प्रलंबित तपास प्रकरणांचा आढावा घेतला, जात केलेल्या मुद्देमालाच्या विल्हेवाटेबाबतची माहिती घेतली, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना बगाटे यांनी पोलिस अधिकारी व अंमलदारांना मार्गदर्शन करताना ‘पोलिसदलात शिस्त’ हीच सर्वात महत्त्वाची असल्याचे ठामपणे सांगितले. नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष न करता त्या तत्परतेने सोडवण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. दापोली हे पर्यटनक्षेत्र असल्याने या भागात अमली पदार्थ्यांचा शिरकाव होऊ नये, यासाठी मिशन फिनिक्सअंतर्गत कडक मोहीम राबवण्याचे आदेश त्यांनी दिले.
अमली पदार्थांची खरेदी विक्री आणि सेवन करणाऱ्यांविरोधात कोणतीही गय न करण्याचे त्यांनी स्पष्ट केले. वाढत्या सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तांत्रिक उपाययोजना आणि जनजागृतीवर भर देण्याचे आदेशही या वेळी दिले. नागरिकांशी थेट संवाद साधला आणि अडचणीच्यावेळी ‘डायल ११२’ चा वापर करण्याचे आवाहन केले. दापोली तालुक्यातील नागरिक आणि पोलिस पाटील यांची विशेष बैठक घेतली. यावेळी त्यांनीसोशल मीडियाचा सुरक्षित वापर आणि सायबर फसवणुकीपासून बचाव, महिलांची सुरक्षा आणि वाहतूक नियमांचे पालन, संशयास्पद व्यक्ती किंवा घटनेची माहिती देण्या साठी ‘डायल ११२’ चा प्रभावी वापर, नागरिकांनी मांडलेल्या विविध तक्रारी आणि सूचनांचे पोलिस अधीक्षकां नी घटनास्थळीच निवारण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी खेड उपविभा गाचे उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश सनम, महेश तोरस्कर, अधिकारी, अंमलदार, उपस्थित होते.
