रत्नागिरी -कोकण रेल्वेची विनातिकीट प्रवाशांवर धडक कारवाई

यामध्ये ४३ हजार ८९६ अनधिकृत प्रवासी आढळले.

Must read

कोकण रेल्वेमार्गावर विनातिकीट आणि अनियमित प्रवास करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने राबवलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश आले आहे. डिसेंबर २०२५ या एकाच महिन्यात रेल्वेने ४३ हजारांहून अधिक प्रवाशांवर कारवाई करून २ कोटी ४५ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे तर संपूर्ण वर्षभरात हा आकडा तब्बल २० कोटींच्या पार गेला आहे. डिसेंबरमध्ये ९९८ मोहिमा कोकण रेल्वे कॉपर्पोरेशन लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, अधिकृत प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी डिसेंबर २०२५ मध्ये एकूण ९९८ विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबवण्यात आल्या. यामध्ये ४३ हजार ८९६ अनधिकृत प्रवासी आढळले. त्यांच्याकडून रेल्वेभाडे आणि दंडस्वरूपात २ कोटी ४५ लाख रुपये वसूल केले आहेत. जानेवारी ते डिसेंबर २०२५ या वर्षभराच्या कालावधीत कोकण रेल्वेने ८ हजार ४८१ विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या.

वर्षभरात एकूण ३ लाख ६८ हजार ९०१ प्रवाशांवर विनातिकीट किंवा अनियमित प्रवासासाठी कारवाई करण्यात आली. या संपूर्ण वर्षात दंड आणि थकीत भाड्यापोटी रेल्वेच्या तिजोरीत २० कोटी २७ लाख रुपये जमा झाले आहेत, आरपीएफ आणि रेल्वे अधिकाऱ्यांची संयुक्त कारवाई रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वेच्या तिकीट तपासणी अधिकाऱ्यांच्या समन्वयाने ही मोहीम कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गावरील गाड्या आणि स्थानकांवर राबवण्यात आली. भविष्यातही अशाच प्रकारच्या तीव्र मोहिमा सुरू राहतील, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article