कठीण प्रवासामुळे चर्चेत आहे. पडद्यावर प्रेक्षकांना खळखळून हसवणारा शारिब खऱ्या आयुष्यात एका मोठ्या संकटाचा सामना अतिशय धैर्याने करत आहे. त्याची पत्नी नसरीन हाश्मी (Nasreen Hashmi) ही गेल्या सहा वर्षांपासून ‘ओरल कॅन्सर’ (तोंडाचा कर्करोग) या जीवघेण्या आजाराशी झुंज देत आहे. विशेष म्हणजे, तिने आतापर्यंत पाच वेळा या आजारावर मात केली आहे, परंतु आता सहाव्यांदा तिला पुन्हा कर्करोगाचे निदान झाले असून तो शरीरात पसरला आहे.
कर्करोगाशी लढा आणि बदललेला चेहरा
नसरीन यांना २०१८ मध्ये पहिल्यांदा कर्करोग असल्याचे समजले. तेव्हापासून आतापर्यंत त्यांच्यावर पाच मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. या शस्त्रक्रियांमुळे त्यांच्या चेहऱ्यातही बराच बदल झाला आहे. नसरीन सांगतात की, कधीकधी आरशात पाहिल्यावर जुन्या फोटोंची आठवण येते आणि मन दुखावते, पण ‘मी जिवंत आहे’ ही जाणीव त्यांना लढण्याचे बळ देते.
शारिबची खंबीर साथ
या संपूर्ण प्रवासात शारिब हाश्मी पत्नीच्या पाठीशी सावलीसारखा उभा राहिला. शूटिंगमध्ये कितीही व्यस्त असला, तरी तो हॉस्पिटलमध्ये वेळेवर पोहोचायचा. नसरीनने सांगितले की, “तो डिस्चार्ज मिळेपर्यंत बॅग घेऊन तिथेच थांबायचा, तिथून हलतही नसे.” आर्थिक अडचण असूनही त्याने कोणाकडूनही मदत न घेता स्वतःच्या कष्टाने उपचारांचा सर्व खर्च उचलला आहे.
संघर्षाचे ३० वर्षांचे नाते
शारिब आणि नसरीन यांचे नाते किशोरवयापासूनचे आहे. २००३ मध्ये त्यांचे लग्न झाले. जेव्हा शारिबने अभिनयासाठी आपली चांगली नोकरी सोडली, तेव्हा नसरीनने घराचा गाडा चालवण्यासाठी स्वतःचे दागिने विकले होते. आज जेव्हा नसरीन कठीण काळातून जात आहे, तेव्हा शारिब तिची सर्वात मोठी ताकद बनला आहे.
