विराटचा तो आक्रमक अवतार! मुंबई इंडियन्ससाठी हा सामना म्हणजे ‘करो या मरो’ अशी स्थिती होती. मात्र, शेवटच्या चेंडूवर आरसीबीने विजय मिळवताच मैदानावर वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. सीमारेषेवर उभा असलेला विराट कोहली विजयाची अधिकृत घोषणा होताच सुसाट धावत खेळपट्टीच्या दिशेने आला. हवेत फिस्ट पंप करत आणि जोरदार गर्जना करत त्याने आपला आनंद साजरा केला. विराटचा हा जोश पाहून स्टेडियममधील चाहत्यांनी एकच जल्लोष केला.
मुंबई स्पर्धेबाहेर, विराटचा जल्लोष का? मुंबई आणि बंगळुरू यांच्यातील जुनी ‘रायव्हलरी’ सर्वांनाच ठाऊक आहे. या पराभवासोबतच मुंबई इंडियन्सचे आयपीएल २०२६ मधील आव्हान अधिकृतपणे संपुष्टात आले आहे. विराटच्या या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत असून, नेटकरी याला “मोमेंट ऑफ द मॅच” म्हणत आहेत. सामन्यादरम्यान विराटने आपल्या सहकाऱ्यांना, विशेषतः भुवनेश्वर कुमारला मारलेली मिठी आरसीबीच्या टीम बॉन्डिंगचे दर्शन घडवून गेली.
भुवी आणि कृणाल ठरले विजयाचे शिल्पकार आरसीबीच्या या ऐतिहासिक विजयात कृणाल पंड्याची ७३ धावांची तुफानी खेळी आणि भुवनेश्वर कुमारने घेतलेले ४ बळी निर्णायक ठरले. शेवटच्या षटकात रसिक सलाम दारने दाखवलेला संयम आरसीबीला गुणतालिकेत थेट अव्वल स्थानावर घेऊन गेला आहे. आता आरसीबीला प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी केवळ एका विजयाची गरज आहे.
